anuradha paudwal yuge atthaavees vitthal aarti [studio] şarkı sözleri
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा
जय देव जय देव जय पाण्डुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा
पावें जिवलगा
जय देव जय देव
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं
कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती
जय देव जय देव पाण्डुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा
जय देव जय देव
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां
राही रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सांवळा
जय देव जय देव जय पाण्डुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा
जय देव जय देव
ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती
जय देव जय देव जय पाण्डुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा
जय देव जय देव
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती
जय देव जय देव जय पाण्डुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या
वल्लभा पावें जिवलगा
जय देव जय देव