asha bhosle ajab hi madhuchandrachi raat şarkı sözleri
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात
हाय मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात
एक चंद्र अन् अगणित तारे
एक चंद्र अन् अगणित तारे
दो हृदयावर किती पहारे
हवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात
सरकारी खर्चात अजब ही मधुचंद्राची रात
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात
माहेराला सोडुन फसले
नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरवात
संसारा सुरवात अजब ही मधुचंद्राची रात
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात
किती पाहुणे किती निमंत्रित
किती पाहुणे किती निमंत्रित
जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर वाऱ्यावरती वरात
वाऱ्यावरती वरात अजब ही मधुचंद्राची रात
ओ मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात