asha bhosle allad mazi preet şarkı sözleri
अल्लड माझी प्रीत
अल्लड माझी प्रीत
तिला ना रीत जगाची ठावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत
अशी असावी सांज साजिरी, सांज साजिरी,
अशी असावी सांज साजिरी
असा असावा वारा
एक सौंगडी संगे यावा
छेडित छेडित तारा
एक सौंगडी संगे यावा
छेडित छेडित तारा
सूर पहाडी बोल रांगडे
मुखात माझ्या यावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत
दबकत दबकत निळ्या नभावर
चांद वाकडा यावा
दबकत दबकत निळ्या नभावर
चांद वाकडा यावा
चांद वाकडा यावा
मुशाफिरासह बोलत जावे
अनोळखीच्या गावा
मुशाफिरासह बोलत जावे
अनोळखीच्या गावा
वाट सोडुनी वाट सोडुनी
भटकत भटकत रानी गहन शिरावे
आवडेल तो मित्र करावा
त्याच्यासंगे गावे आ हा हा हा ला ला ला ला ल ल ला ल ला ला ला
अल्लड माझी प्रीत