asha bhosle kanthatach rutalya taana şarkı sözleri
कंठातच रुतल्या ताना कंठातच रुतल्या ताना
कुठे ग बाई कान्हा कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा जा जा जा
घेउनि या मोहना कंठातच रुतल्या ताना
कदंब फांद्यावरी बांधिला पुष्पपल्लवगंधित झोला
कदंब फांद्यावरी बांधिला पुष्पपल्लवगंधित झोला
कसा झुलावा परि हा निश्चल कसा झुलावा परि हा निश्चल
कुंजविहारीविना जा जा जा
घेउनि या मोहना कंठातच रुतल्या ताना
थांबे सळसळ जशि वृक्षांची थांबे सळसळ जशि वृक्षांची
कुजबुज सरली झणि पक्ष्यांची कुजबुज सरली झणि पक्ष्यांची
ओळखिचे स्वर कानि न येता ओळखिचे स्वर कानि न येता
थबके ही यमुना जा जा जा जा
घेउनि या मोहना कंठातच रुतल्या ताना
मुरलीधर तो नसता जवळी सप्तस्वरांची मैफल कुठली
मुरलीधर तो नसता जवळी सप्तस्वरांची मैफल कुठली
रासक्रिडेची स्वप्ने विरली रासक्रिडेची स्वप्ने विरली
एका कृष्णाविना जा जा जा जा
घेउनि या मोहना कंठातच रुतल्या ताना
कंठातच रुतल्या ताना
कुठे ग बाई कान्हा कुठे ग बाई कान्हा
कुणीतरी जा जा जा जा
घेउनि या मोहना कंठातच रुतल्या ताना आ आ