asha bhosle naam gheta tuze govind şarkı sözleri
नाम घेता तुझे गोविंद
नाम घेता तुझे गोविंद
मनी वाहे भरुनि आनंद
नाम घेता तुझे गोविंद
हृषिकेशी बंन्सिबिहारी
गोकुळिचा कुंजविहारी
हृषिकेशी बंन्सिबिहारी
गोकुळिचा कुंजविहारी
कुणि म्हणती कृष्ण मुरारी
कुणि म्हणती कृष्ण मुरारी
कुणि मिलिंद आणि मुकुंद
नाम घेता तुझे गोविंद
नाम घेता तुझे गोविंद
विश्वाचा नाथ म्हणोनी
हासते विश्व तव वदनी
विश्वाचा नाथ म्हणोनी
हासते विश्व तव वदनी
तव नामे तुझिया चरणी
तव नामे तुझिया चरणी
नाचते यमुनाजळ धुंद
नाम घेता तुझे गोविंद
नाम घेता तुझे गोविंद
तू शब्द ओळीओळीत
तू अर्थ मधुर गीतेत
तू शब्द ओळीओळीत
तू अर्थ मधुर गीतेत
तू ताल भक्तिगीतात
तू ताल भक्तिगीतात
तू सुरासुरांत सुगंध
नाम घेता तुझे गोविंद
मनी वाहे भरुनि आनंद
नाम घेता तुझे गोविंद