asha bhosle pavasat nahati şarkı sözleri
पावसात नाहती लता लता कळ्या फुले
पावसात नाहती लता लता कळ्या फुले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
पावसात नाहती
शांत शांत आसमंत शीत वात धावतो
अंगअंग चिंब हो चुकार थेंब चावतो
घे कुशीत आसरा जवळ येई प्रेमले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
पावसात नाहती
हाच योग ना सखे तू मनात ठेवला
आयता घरातळी मिठीत चंद्र गावला
कोटरात पक्षीही असेच आज झोपले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
पावसात नाहती
पाहिजे तसे घडे लाज तरीही वाटते
सौख्य सहज लाभता भीती आत दाटते
गारठ्यातही उगा का कपोल तापले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
पावसात नाहती