asha bhosle pritichya poojes jaata şarkı sözleri
प्रीतिच्या पूजेस जाता
मी अशी का थांबले
प्रीतिच्या पूजेस जाता
मी अशी का थांबले
दाटते भीती उरी का
दाटते भीती उरी का
थबकती का पाऊले
थबकती का पाऊले
प्रीतिच्या पूजेस जाता
मी अशी का थांबले
चढुन जाता पायर्या या
मानिनी होते सती
चढुन जाता पायर्या या
मानिनी होते सती
देवता येथून गेल्या
पद्मजा वा पार्वती
पुण्यपंथी चालता या
पुण्यपंथी चालता या
मीच का भांबावले
थबकती का पाऊले
प्रीतिच्या पूजेस जाता
मी अशी का थांबले
दूर हो लज्जे जराशी
मजसी आता जाऊ दे
दूर हो लज्जे जराशी
मजसी आता जाऊ दे
साजरे सौभाग्य माझे
मजसी पुरते पाहू दे
दोन जीवा जोडणारे
दोन जीवा जोडणारे
जोडवे हे वाजले
थबकती का पाऊले
प्रीतिच्या पूजेस जाता
मी अशी का थांबले
थांबले