cadencing beats maaf kara raaje (ft. mad v) şarkı sözleri
माफ करा राजे आम्ही इथे चुकलो
स्वराज्याला सुराज्य बनवण्यात मुकलो
माफ करा राजे आम्ही इथे चुकलो
स्वराज्याला सुराज्य बनवण्यात मुकलो
माणूस आहोत म्हणून आम्ही इथे चुकतो
पण शिवभक्त सुधा इथे बिडी फुकतो
झुकतो तुमच्या प्रतीमे समोर आम्ही सगळे इथे झुकतो
पण नंतर मागे गडकिल्ल्यावर पचकन थूकतो
अस का होत राजे कळत नाही
तुमचे गून आमच्या आंगी का वळत नाही
अस का होत राजे कळत नाही
अहो तुमचे गून आमच्या आंगी का वळत नाही.
माफ करा राजे आम्ही इथे चुकलो
स्वराज्याला सुराज्य बनवण्यात मुकलो
माफ करा राजे आम्ही इथे चुकलो
स्वराज्याला सुराज्य बनवण्यात मुकलो
हा
साल १६३० दिवस होता सोनेरी
शिवबा जन्माला तो गड होता शिवनेरी
चंदेरी पाळण्यात जन्माला वाघ अरे खोटा शिवभक्त आहे या राष्ट्रावर डाग
भाग पडला आज मला इथे बोलायला
इकडे माणूस चाललाय माणसाला पैस्याने तोलयाला
धाढी मिशी वाढवून बोलतात आम्ही शिवभक्त
काम यांचे शून्य हे भुंकतात फक्त
काही केल्या हे सुधारणार नाहीत
राज्याच्या कन्या कधी सुरक्षित या प्रश्नाचं उत्तर अजून मिळत नाही
मी जास्त काही बोलत नाही
सगळ्यांचे राजं काही खोलत नाही
डोलत नाही दारूच्या नशेत
शुद्धता आहे माझ्या भाषेत
अहो शुद्धता आहे माझ्या भाषेत
माफ करा राजे आम्ही इथे चुकलो
स्वराज्याला सुराज्य बनवण्यात मुकलो
माफ करा राजे आम्ही इथे चुकलो
स्वराज्याला सुराज्य बनवण्यात मुकलो