ganpat pawar aarati saibaba şarkı sözleri
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा
चरणरजातली द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा आरती साईबाबा
जाळुनियां अनंग स्वस्वरूपी राहेदंग
मुमुक्षूजनां दावी निज डोळा श्रीरंग
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा आरती साईबाबा
जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव
दाविसी दयाघना ऐसी तुझीही माव
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा आरती साईबाबा
तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा
अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा आरती साईबाबा
कलियुगी अवतार सगुण परब्रह्मः साचार
अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा आरती साईबाबा
आठा दिवसा गुरुवारी भक्त करिती वारी
प्रभुपद पहावया भवभय निवारी
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा आरती साईबाबा
माझा निजद्रव्यठेवा तव चरणरज सेवा
मागणे हेचि आता तुम्हा देवाधिदेवा
आरती साईबाबा सौख्यदातार जीवा आरती साईबाबा
इच्छित दिन चातक निर्मल तोय निजसुख
पाजावे माधवा या सांभाळ आपुली भाक

आरती साईबाबा