madhubala chavla saprem namaskar şarkı sözleri
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
तुझ्यावाचुन मला कटवेना सखे ग परदेश
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
आठप्रहर तुम्हासंगती राहते राया
का शंका अशी जीवघेणी मनामधे वाया
सावलीपरी मी उभी बिलगुनी पाया
नको ठेवू मनाच्या ग मनी राग लवलेश
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
उणे अधीक बोलले कधी विसरुनी जावे
रागाने रंगते प्रीत मला ते ठाव
जाणसी सखे तू तुला काय सांगावे
एक मात्र सांगते नारीचा नारी करी द्वेष
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
तुजवाचून दुजा नारीला उरी ना जागा
सांगेन जसे मी तसे यापुढे वागा
केतकीचा पुरे ग गंध झुलिवण्या नागा
दोन कुड्यांमध्ये जीव एक असा न आदेश
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
तुझ्या मनातले वाचले रे
माझे थयथय मन नाचले
चंद्रलोकात मी पोचले
तूच एकला प्रीयकर माझा प्रीतीचा परमेश
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
सप्रेम नमस्कार विनंती विशेष

