pankaj harad sonchafa (pankaj harad) şarkı sözleri
तिला आवडतो सोनचाफा
म्हणून मलाही आवडतो
गेलो होतो खूडायला
कळलं ह्याचा सडाच पडतो
तिला सापडतो सोनचाफा
आवडे मला जेवढी ती
तेवढाच सोनचाफा
रस्ता तिच्या हृदयाचा
वाटे मला सोपा
नव्हतं अस काही
होत्या साऱ्याच थापा
विसरलोच होतो तिला
आवडतो फक्त सोनचाफा
तिला सापडतो सोनचाफा
म्हणून मीही शोधतो
गेलो होतो शोधायला
कळलं ह्याचा सुगंध दरवळतो
तिला सापडतो सोनचाफा
भावार्थ मला न कळला
तिच्या त्या भावनांचा
म्हणूनच मेळ न जुळला
वेगळ्या दोन मनांचा
ती मैत्रीत सुखावली
माझाच हट्ट प्रेमाचा
तीला ही न कधीच कळला
कौल तिच्या हृदयाचा
तिच्या हातात सोनचाफा
पाहून मीही सुखावतो
गेलो होतो आणायला
कळलं ह्याचा बाजार नसतो
तिला सापडतो सोनचाफा