quail music jiv zurla (tifanwadi theme song) şarkı sözleri
जीव झुरला ग जीव झुरला
चांद हसला ग चांद हसला
गालावर खाळी तुझ्या दिसतीया शोभून अशी
मानेवर तीळाचीही बात सखे सांगावी कशी
वाटेवर चालताना झिंग तुझ्या प्रेमाची अशी
सखे सांग मनाची या साद तुला द्यावी मी कशी
जीव झुरला ग जीव झुरला
चांद हसला ग चांद हसला
माझे राणी तुझ्या मागे दिस रात फिरतो असा
जणू काही फुलावर भ्रमराचा पहारा जसा
हाक तुझी ऐकण्याला जीव माझा आतुर असा
जिथं तिथं रूप तुझा दिसे राणी भास ग जसा
जीव झुरला ग जीव झुरला
चांद हसला ग चांद हसला